शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
3
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
5
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
6
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
7
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
8
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
9
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
10
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
11
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
12
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
13
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
14
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
15
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
16
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
17
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
18
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
19
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
20
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 

रेशीम शेतीलाही निसर्गाच्या अनियमिततेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 2:47 PM

केवळ ३२८ शेतकºयांनीच रेशीम शेतीसाठी तुती लागवड केली.

वाशिम : पश्चिम वºहाडात इतर पिकांप्रमाणेच रेशीम शेतीलाही निसर्गाच्या अनियमिततेचा फटका बसत आहे. गतवर्षी पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यात मिळून १६०० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नोंदणी केली असली तरी, केवळ ३२८ शेतकºयांनीच रेशीम शेतीसाठी तुती लागवड केली. त्यामुळे रेशीम शेती वाढविण्याच्या शासनाच्या उद्देशाला तडा जात असल्याचे दिसत आहे.गेल्या काही वर्षांता वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हमखास व नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी रेशीम उद्योग शेतकºयांना वरदान ठरु शकतो. ही बाब हेरूनच राज्य व केंद्रशासनाच्या विविध योजनांतून रेशीम योजना राबविण्यात येत आहे. शेतकºयांना रेशीम शेतीकडे वळविण्यासाठी दरवर्षी महारेशीम अभियानांतर्गत नोंदणी करण्यात येत आहे. तथापि, पश्चिम वºहाडात इतर पिकांप्रमाणेच निसर्गाच्या अनियमिततेचा फटका रेशीम शेतीलाही बसत असल्याचे गतवेळच्या हंगामातील तुती लागवडीवरून स्पष्ट झाले. गतवर्षी पश्चिम वºहाडातील तब्बल १६०० शेतकºयांनी महारेशीम अभियानांतर्गत नोंदणी केली होती. त्यात वाशिम जिल्ह्यात ५८०, अकोला जिल्ह्यात ५१५, तर बुलडाणा जिल्ह्यात ४९५ शेतकºयांनी केलेल्या नोंदणीचा समावेश होता. तथापि, या तिन्ही जिल्ह्यात मिळून केवळ ३२८ शेतकºयांनी रेशीम शेतीसाठी तुती लागवड केली. त्यात अकोला जिल्ह्यातील १२५, वाशिम जिल्ह्यातील ११३, तर बुलडाणा जिल्ह्यातील १०० शेतकºयांचा समावेश होता. तुती लागवड केली. गतवेळच्या हंगामात मान्सून महिनाभर लांबल्याने शेतकºयांना तुती लागवडीत स्वारस्य वाटले नाही आणि त्यांनी खरीप पिकांची लागवड केली. आता यंदाही महारेशीम अभियानांतर्गत शेतकºयांची नोंदणी सुरू आहे. त्यात अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी, वाशिम जिल्ह्यात मात्र नोंदणी करण्यासही शेतकरी उदासीन असल्याचे या संदर्भात रेशीम विकास अधिकाºयांकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.आपल्याकडचे वातावरण रेशीमशेतीसाठी पोषक आहे; परंतु गतवेळी मान्सूनला महिनाभराचा विलंब झाल्याने शेतकºयांची रेशीम शेतीसाठी तुती लागवड करण्यास उदासीनता दिसून आली. यंदा अधिकाधिक शेतकºयांचा याकडे कल वाढविण्याचा प्रयत्न होत आहे.-अरविंद मोरे,रेशीम विकास अधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती