‘साहेब आपला सिम्बॉल काय? पंजा की कमळ एकदा क्लिअर करा!’ -  व्हीडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 02:55 PM2019-11-05T14:55:00+5:302019-11-05T14:55:31+5:30

कोण्यातरी कार्यकर्त्यांने या घटनेचा व्हिडीओ काढून व्हायल केल्याने याबाबत चविष्टपाणे चर्चा रंगताना दिसून येत आहेत.

 'Sir, what is your symbol? Hand or Lotus! '- Video viral | ‘साहेब आपला सिम्बॉल काय? पंजा की कमळ एकदा क्लिअर करा!’ -  व्हीडीओ व्हायरल

‘साहेब आपला सिम्बॉल काय? पंजा की कमळ एकदा क्लिअर करा!’ -  व्हीडीओ व्हायरल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : केंद्रीय मनुष्यबळ विकास दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे यांनी शनिवारी मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी ते शिरपूर येथे पाहणी करण्याकरिता गेले असता भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना घोळका घालून प्रश्नांचा भडीमार केला. भाजपा नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीत पंजाचे काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्यात. आपला सिम्बॉल काय पंजा की कमळ असा प्रश्न उपस्थित केला. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने याबाबत चांगलीच चर्चा रंगताना दिसून येत आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे यांनी मालेगाव तालुक्यातील शिरपूर, वसारी, पांगरी कुटे आदी गावांना नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी बाधीत शेतकऱ्यांनी धोत्रे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपबिती कथन केली. ते शिरपूर येथे गेले असता त्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
शिरपूरमध्ये पोहचल्याबरोबर काही कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. यावेळी धोत्रे यांना कार्यकर्ते म्हणाले की, साहेब विधानसभा निवडणुक मतदानाच्या काही दिवसापूर्वी याच मतदारसंघातील भाजपाचे नेते, माजी आमदार यांनी कार्यकर्त्यांना ‘पंजा’चे काम करण्याच्या सूचना दिल्यात. आम्ही रात्रंदिवस ज्या पक्षाच्या विरोधात उभे आहोत त्याच पक्षाचे काम आम्हाला करावयास सांगणे कितपत योग्य आहे. साहेब तुम्ही एकदा क्लिअर करा की आपला सिम्बॉल पंजा आहे की कमळ. यावेळी मात्र धोत्रे यांना काय बोलावे सुचेनासे झाल्याने त्यांनी चुकीचे आहे एवढे म्हणून विषय बाजुला सारला. परंतु कोण्यातरी कार्यकर्त्यांने या घटनेचा व्हिडीओ काढून व्हायल केल्याने याबाबत चविष्टपाणे चर्चा रंगताना दिसून येत आहेत.


केंद्रीय मंत्री महोदयांसोबत मी दौºयावर असताना हा प्रकार घडला. परंतु ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत ते तर भाजपाचे कार्यकर्तेच नव्हते. दुसरी बाब म्हणजे कोणी तरी त्यांना पुढे करण्याचा प्रयत्न केला असावा. माझ्या कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता ते भाजपाचे कार्यकर्ते नसल्याने त्यांनी माफी सुध्दा मागितली. विशेष म्हणजे मी भाजपाचा निष्ठावान असल्याने दुसºया पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे सांगणार कशाला . नागरिक सुज्ञ आहेत त्यांना हेसांगण्याची गरज नाही.

-विजयराव जाधव, माजी आमदार

 

Web Title:  'Sir, what is your symbol? Hand or Lotus! '- Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.