जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. मात्र, मृत्यूसत्र कायम असल्याने नागरिकांमध्ये थोडी धाकधूक कायम आहे. आणखी ६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद गुरुवारी घेण्यात आली. दुसरीकडे नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येते. जिल्ह्याबाहेरील २१ बाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
००००००००००००
२७८३ सक्रिय रुग्ण
गुरुवारच्या अहवालानुसार नव्याने ३४७ रुग्ण आढळून आले, तर ३१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृह विलगीकरणात असे एकूण २७८३ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
ग्रामीण भागात अधिक रुग्ण
गत काही दिवसांपासून शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. वाशिम तालुक्यातील एकांबा- १८, पार्डी आसरा- ८, पिंपळगाव- ८, कारंजा तालुक्यातील शिवण- १५ असे रुग्ण आढळून आले आहेत.
०००