वाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी सहा जणांचा मृत्यू तर ४७४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १८ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २२२६८ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यूचा आकडा वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. रविवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी सहा जणांचा मृत्यू झाला तर ४७४ जणांना कोरोना संसर्ग झाला. वाशिम शहरातील अंबिका नगर येथील १, बाहेती हॉस्पिटल परिसरातील २, बालाजी नगर येथील ४, चामुंडादेवी परिसरातील १, सामान्य रुग्णालय परिसरातील १०, सिव्हील लाईन्स येथील २, दत्त नगर येथील २, देवळे हॉस्पिटल परिसरातील ११, ड्रीमलँड सिटी परिसरातील २, गव्हाणकर नगर येथील ५, गोटे कॉलेज परिसरातील १, ग्रीन पार्क कॉलनी येथील १, गुरुवार बाजार येथील १, आययुडीपी कॉलनी येथील ५, कारागृह निवासस्थाने परिसरातील २, जैन भवन येथील २, जवाहर कॉलनी येथील १, काळे फाईल येथील १, लाखाळा येथील ९, नगर परिषद परिसरातील १, नालंदा नगर येथील १, पोलीस वसाहत येथील ३, पुसद नाका येथील २, आर. ए. कॉलेज जवळील २, संतोषी माता नगर येथील २, शिंपी वेताळ येथील १, शुक्रवार पेठ येथील ४, सुंदरवाटिका येथील २, तहसील कार्यालय परिसरातील १, ठाकरे हॉस्पिटल परिसरातील २, विनायक नगर येथील १, वाशिम क्रिटीकल केअर परिसरातील ३, समर्थ नगर येथील १, आनंदवाडी येथील १, जिल्हा परिषद शाळा परिसरातील १, चंडिकावेस येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, अनसिंग येथील ६, चिखली सुर्वे येथील ५, धुमका येथील १, फाळेगाव येथील १, हिवरा रोहिला येथील १, जांभरुण परांडे येथील १, झाकलवाडी येथील २, जांभरुण येथील २, कानडी येथील ४, काटा येथील ७, केकतउमरा येथील १, खंडाळा येथील १, किनखेडा येथील १, कोंडाळा झामरे येथील १, नागठाणा येथील २८, पांडव उमरा येथील ३, पार्डी टकमोर येथील १, शिरपुटी येथील १, सोंडा येथील ७, तामसी येथील २, तोंडगाव येथील २, उमरा कापसे येथील १, वाळकी येथील १, कार्ली येथील २, मालेगाव शहरातील ६, आमखेडा येथील १, किन्हीराजा येथील १, जामखेड येथील १, जऊळका येथील १, कवरदरी येथील ४, मेडशी येथील १, पांगरी धनकुटे येथील १, पिंपळा येथील २, सोनाळा येथील २, वारंगी कॅम्प येथील १, करंजी येथील २, राजुरा येथील १, शिरपूर येथील २, गौरखेडा येथील १, दुधाळा येथील १, अमानी येथील २, पांगरी नवघरे येथील १, पांगराबंदी येथील १, रिसोड शहरातील अनंत कॉलनी येथील ३, बालाजी मंदिर जवळील १, चांदणी चौक येथील ४, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील ६, गजानन नगर येथील २, कासार गल्ली येथील २, कुंभार गल्ली येथील १, लोणी फाटा येथील २, महानंदा कॉलनी येथील १, आॅईल मिल परिसरातील ८, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, राम नगर येथील २, जैन मंदिर परिसरातील १, साई ग्रीन पार्क कॉलनी परिसरातील १, समर्थ नगर येथील १, शिक्षक कॉलनी येथील २, शिवाजी नगर येथील ५, व्यंकटेश नगर येथील २, वाणी गल्ली येथील १, निजामपूर रोड येथील १, भाजी मंडी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३४, आंचळ येथील २, भर जहांगीर येथील १, बोरखेडी येथील ४, चिंचाबा भर येथील ३, चिखली येथील १३, धोडप बु. येथील ४, एकलासपूर येथील २, गणेशपूर येथील २, घोटा येथील १, गोहगाव येथील ११, गोवर्धन येथील १२, हराळ येथील १, जांब आढाव येथील ४, केनवड येथील ५, लिंगा येथील २, लोणी येथील १, मसला पेन येथील ३, मोप येथील २, मोरगव्हाण येथील १, मोठेगाव येथील ३, निजामपूर येथील १, पेडगाव येथील २, शेलगाव येथील ४, शेलू खडसे येथील १, व्याड येथील ३, वडजी येथील १, वाकद येथील २, मिझार्पूर येथील १, शिवणी येथील १, घोन्सर येथील ३, बिबखेडा येथील १, धोडप खु. येथील १, मंगरूळपीर शहरातील हुडको कॉलनी येथील १, मानोरा चौक येथील ४, पंचशील नगर येथील १, मंगलधाम येथील ७, शहरातील इतर ठिकाणचा १, बोरवा येथील ९, कवठळ येथील ३, निंबी येथील १, शहापूर येथील २, शेलूबाजार येथील १, पिंप्री खुर्द येथील १, शेंदूरजना मोरे येथील २, मेडशी येथील १, गिर्डा येथील १, चिंचखेडा येथील १, जोगलदरी येथील १, सोनखास येथील १, वार्डा येथील १, कारंजा शहरातील बालाजी नगर येथील १, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील १, सिंधी कॅम्प येथील १, यशोदा नगर येथील १, गौतम नगर येथील १, आनंद नगर येथील १, जागृती नगर येथील १, सुंदरवाटिका येथील १, तुळजा भवानी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, किनखेड येथील १, कोळी येथील १, कुपटी येथील ४, पोहा येथील १, रामनगर येथील ३, उंबर्डा बाजार येथील २, लोहारा येथील १, मानोरा शहरातील मदिना नगर येथील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील २, शेंदूरजना आढाव येथील ३, वटफळ येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १२ बाधिताची नोंद झाली असून १९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह २२२६८
ऍक्टिव्ह ४०४४
डिस्चार्ज १७९८८
मृत्यू २३५