०००
राजुरा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
वाशिम : राजुरा परिसरातील ग्रामीण रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. इतर गावांना जोडणारे रस्ते दयनीय अवस्थेत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.
०००
अग्निशमन यंत्र बसविण्याकडे दुर्लक्ष
वाशिम : शासकीय कार्यालये, बँका, ग्रामीण रुग्णालय यासोबतच काही खासगी रुग्णालयांत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक अशी अग्निशमन यंत्रे बसविलेली नाहीत. त्यामुळे आग लागल्यास तातडीने नियंत्रण कसे मिळवावे? असा प्रश्न आहे.
००००
जऊळका कॅम्प येथे आरोग्य पथक
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका कॅम्प येथील पाच जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे २० एप्रिल रोजी निष्पन्न झाले. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य चमूने जऊळका कॅम्प गाठत कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची माहिती घेतली.
०००००
कोरोनामुळे लघुव्यवसाय झाले ठप्प
वाशिम : कोरोनामुळे जिल्ह्यातील लघुव्यवसाय ठप्प पडले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांवर संकट ओढवले. शासनाने लघु व्यावसायिकांसाठी एखादे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.
०००००००
मालेगाव तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जंगलालगतच्या शेतांमध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस सुरू आहे. पाण्याच्या शोधात हे प्राणी शेत आणि गावाकडे धाव घेत आहेत. वन्यप्राण्यांमुळे जंगल परिसरातील नागरिक व शेतकरी त्रस्त आहेत.