शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पीक कर्ज वितरणात सहा हजार सभासदांची नव्याने भर!

By admin | Published: July 07, 2016 2:12 AM

पालकमंत्र्यांच्या निर्देशांची अंमलबजावणी संथ गतीने : केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेने गाठले उद्दिष्ट!

वाशिम : खरीप पीक कर्ज वाटपात यावर्षी सहा हजार नव्या सभासदांची भर पडली आहे. दुसरीकडे पीक कर्ज वितरणात दिरंगाई करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दस्तुरखुद्द पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांनी दिलेले असतानाही, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंंत काही राष्ट्रीयीकृत बँकांना उद्दिष्टपूर्ती करता आली नाही.२0१५ या वर्षात पावसाने दगा दिला. त्यानंतर परतीच्या पावसानेदेखील शेतकर्‍यांचा भ्रमनिरास केला. विविध कारणांमुळे खरीप व रब्बीचे समाधानकारक पीक हाती आले नाही. संकटांची ही मालिका कमी म्हणून की काय, यात शेतमालाच्या अत्यल्प भावाची भर घालण्यात आली. चोहोबाजूंनी आलेल्या चक्रीवादळात अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी कोलमडून गेला. आता पुन्हा नव्या उमेदीने बँकांच्या पीक कर्जरुपी कुबड्याच्या आधारावर उभे राहण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नांना अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेचा अपवाद वगळता उर्वरित बँका जुलै महिन्यातही फारसा प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव शेतकर्‍यांना येत आहे. ३१ मे पूर्वी पीक कर्ज वितरणाचे ८0 टक्के उद्दिष्ट्य गाठण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले होते. या निर्देशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बँक प्रशासनाची बैठक घेऊन पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट गाठण्याच्या सूचना दिल्या. तालुका व मंडळ स्तरावर बैठका घेण्यात आल्या. पीक कर्ज वितरणात दिरंगाई करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. कारवाईच्या भीतीने काही राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाला प्राधान्य दिले, तर काही बँकांनी प्रशासनाच्या निर्देशांना धाब्यावर बसविले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सात राष्ट्रीयीकृत बँकेचा अपवाद वगळता उर्वरित सर्व बँका ७0 टक्क्यांच्या आत आहेत.४ जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अपवाद वगळता एकाही बँकेला पीक कर्ज वाटपाचे १00 टक्के उद्दिष्ट गाठता आले नाही. ४ जुलैपर्यंत एकूण ९८ हजार ७२१ शेतकर्‍यांना, ७६७ कोटी ८१ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३४६ कोटी ३२ लाख, तर राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँक ४२१ कोटी ४९ लाख रुपये पीक कर्ज वाटप केले. २0१६ च्या खरीप हंगामात ५९१३ या नवीन सभासद शेतकर्‍यांना ४४ कोटी ३६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.