कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नवी नियमावली अमलात आणली आहे. यानुसार केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू आहेत, त्यामुळे गरीब मजुरांवर व लघू उद्योगधारकांवर उपासमारीची पाळी आली. यासाठी शासनाने टाळेबंदी लवकरात लवकर उठवावी, अशी मागणी या परिसरातील गरीब मजूर व लहान उद्योगधारक करीत आहेत. कोरोना या महामारीने एक वर्षापासून लघू व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिक संकटात सापडला आहे. गेल्या वर्षीसुद्धा कोरोनाने मोठा हाहाकार केला होता. अनेक लघू व्यावसायिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता कसाबसा सुरू झालेला व्यवसाय पुन्हा बंद होत असल्याने व्यावसायिकांसमोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी उसणवारी करून आणलेले पैसे परत कसे करावे, हा प्रश्न सध्या उभा ठाकला आहे. रोजगार उपलब्ध नसल्याने पेच निर्माण झाला आहे.
रोजगाराअभावी लघू व्यावसायिक, मजूर अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:39 AM