वाशिम : सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची सार्वजनिक ठिकाणी, शाळा- महाविद्याल परिसरात जाहिरात अथवा विक्री करणाऱ्यांविरूद्ध वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘कोटपा-२००३’ कायद्यान्वये धडक कारवाई मोहिम हाती घेण्यात आली. याअंतर्गत पोलिसांनी कोटपा कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या ९३ जणांवर गत दोन दिवसांत दंडात्मक कारवाई केली असून जवळपास १८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने, जाहिरात बंदी कायदा ( कोटपा- २००३) नुसार सार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक संस्था तसेच सरकारी कार्यालय परिसरात खुल्लेआम सिगारेट सेवन करणे, अवैधपणे सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे गुन्हा आहे. मात्र, तरीदेखील या नियमांचे सर्रास उल्लंघन करित धूम्रपान करणाºयांवर वाशिम जिल्हा पोलिसांनी कोटपा कायद्यानुसार कारवाई केली. जिल्ह्यातील अकराही पोलीस ठाणे क्षेत्रात ही मोहीम राबविण्यात आली. त्यात पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, हरीश गवळी, गणेश भाले, मोतीराम बोडखे, गजानन गुल्हाने, धुर्वास बावनकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक किरण साळवे, विनायक जाधव, सुभाष अंबुलकर, अशोक कांबळे, पोलीस उप निरीक्षक विनायक जाधव, खंदारे, मानेकर आदिंच्या पथकांनी सहभाग नोंदविला. या मोहिमेकरीता वाशिम जिल्हा पोलिसांना संबंध हेल्थ फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातूम कोटपा कायद्याचे खास प्रशिक्षणही देणार आले आहे. या कारवाईबाबत नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान; ९३ जणांवर कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 2:17 PM
पोलिसांनी कोटपा कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या ९३ जणांवर गत दोन दिवसांत दंडात्मक कारवाई केली असून जवळपास १८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ठळक मुद्देसार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक संस्था तसेच सरकारी कार्यालय परिसरात खुल्लेआम सिगारेट सेवन करणे, अवैधपणे सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे गुन्हा आहे.या नियमांचे सर्रास उल्लंघन करित धूम्रपान करणाºयांवर वाशिम जिल्हा पोलिसांनी कोटपा कायद्यानुसार कारवाई केली. जिल्ह्यातील अकराही पोलीस ठाणे क्षेत्रात ही मोहीम राबविण्यात आली.