कारंजा लाड : अचानकपणे निघून गेलेल्या आपल्या मित्राप्रती आपले प्रेम व सद्भावना जपत आपल्या मित्राप्रमाणेच समाजसेवेचे वेड असलेल्या तरुणांनी एकत्र येऊन कोरोना काळात अत्यावशक सेवा देणारे आरोग्य कर्मचारी, पोलीस बांधवांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी हँड सॅनिटायझर, मास्क व सर्जिकल हँडग्लोव्हज इत्यादी सामग्रीचे वाटप परिवर्तन बहुद्देशीय संस्था, कारंजा लाड यांच्या वतीने कामरगाव ग्रामीण रुग्णालय आणि पोलीस चौकी कामरगाव येथे करण्यात आले. तसेच गरीब गरजू लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने उपजिल्हा रुग्णालय कारंजा लाड येथे स्व. आकाश ठाकरे स्मृतिप्रीत्यर्थ स्व. आकाश ठाकरे मित्र परिवाराच्या वतीने वॉटर कूलर देण्यात आले. यावेळी तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार मांजरे, उपजिल्हा रुग्णालय कारंजाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहाने, स्व. आकाश ठाकरे मित्र परिवारचे सदस्य, रुग्णालयाचे कर्मचारी, कामरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम.एन. ढोपरे, कामरगावचे सरपंच तुमसरे, ग्रा.पं. कामरगावचे सर्व सदस्य, ग्राम शिवणचे पोलीस पाटील सुधीर आखरे, परिवर्तन बहुद्देशीय अध्यक्ष पंकज रोकडे, सचिव वानखडे, उपाध्यक्ष कैवल्य सार्वे, कोषाध्यक्ष अभय राठोड, पोलीस चौकी कामरगावचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हजर होते.
स्वर्गीय मित्राच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:30 AM