लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जलसंधारणाच्या कार्याला बळकटी देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जलरत्नांचा ५ आॅगस्ट रोजी येथील नियोजन भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटणी होते. आमदार अमित झनक, उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, पाणी फाऊंडेशनचे विदर्भ समन्वयक चिन्मयदादा फुटाणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्योती गणेशपुरे, तहसिलदार सचिन पाटील, डॉ. शरद जावळे, तहसिलदार वैशाख वाहुरवाघ, शरद दहातोंडे, पवन मिश्रा, तालुका कृषि अधिकारी सचिन कांबळे, संतोष गवळे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारंजा व मंगरुळपीर तालुक्यातील पाणी फाऊंडेशन, सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेणाºया मान्यवरांचा शाम सवाई, देवेंद्र राऊत, रविंद्र लोखंडे, अश्विन बहुरुपी, संदीप राऊत, वैभव किर्तनकर, आकाश उके, दिपक बकाल यांनी ग्रामगीता व वृक्षभेट देवून सत्कार केला. स्पर्धेत सहकार्य करणारे वॉटरहिरो म्हणून नीलेश सोमाणी, अविनाश मारशेटवार, सुखदेव इंगळे, रविंद्र इंगोले, केशवराव भगत यांच्यासमवेत कारंजा तालुक्यातील विळेगाव, बेलमंडळ, पिंपळगाव, बांबर्डा, काकडशिवणी, पोहा, दोनद बु., अनई, पिंप्री मोडक, धनज बु., शहादतपुर, जानोरी, धोत्रा जहांगीर, धोत्रा देशमुख, बेलखेड, झोडगा, ब्राम्हणवाडा, भुलोडा, कामठा, मंगरुळपीर तालुक्यातील नागी, जांब, मोहरी, पिंपळखुटा, लाठी, सायखेडा, शेंदुरजना मोरे, बोरव्हा, कोठारी, पार्डी ताड, तपोवन, कोळंबी, शेलगाव, वनोजा, दाभा, घोटा, धोत्रा, लखमापुर आदी गावातील सरपंच, कार्य करणारे समाजसेवक, अधिकारी, ग्रामसेवक, पुढारी, पदाधिकारी व विविध सामाजीक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार पाटणी यांनी पाणी हे जिवन आहे, लोकप्रतिनिधीकडून जनतेने विकासाची अपेक्षा ठेवावी. विकासासाठी त्यांना वेळप्रसंगी वेठीस धरावे, असे आवाहन करीत भारतीय जैन संघटना व शासनाच्या वतीने यावर्षी वाशिम जिल्हा सुजलाम सुफलाम केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाम सवाई, देवेंद्र राऊत, रविंद्र लोखंडे यांनी केले.
वाशिममध्ये पाणी फाऊंडेशनच्या वतीने जलरत्नांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 1:44 PM