वाशिम, दि. २६- स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलातील वसतिहावर लाखो रुपये खचरून सौरऊर्जा प्रकल्पाचे ९ संयंत्र बसविण्यात आले. मात्र, देखभाल-दुरूस्तीअभावी सर्वच संयंत्र आजमितीस निकामी झाले असून लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ ठरला आहे. 'लोकमत'ने सोमवार, २६ सप्टेंबर रोजी केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णमध्ये हे वास्तव उजागर झाले.विद्यूतवर होणार्या खर्चात बचत व्हावी तद्वतच अखंडित वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, या मूळ उद्देशाने जिल्हा क्रीडा संकुलातील वसतीगृहावर साधारणत: साडेतीन वर्षापूर्वी ९ सौरऊर्जा संयंत्र प्रस्थापित करण्यात आले. मात्र, नियमित देखभाल-दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने तसेच याकामी लागणारा निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे सर्वच्या सर्व संयंत्र आजरोजी निकामी ठरले असून या संयंत्रांच्या बॅटर्या देखील नादुरूस्त झाल्याचे ह्यस्टिंग ऑपरेशनह्णदरम्यान आढळून आले. *सयंत्राची दुरूस्ती झाल्यास होऊ शकतो वापरलाखो रुपये किमतीच्या नादुरूस्त असलेल्या सौरऊर्जा संयंत्रांची दुरूस्ती केल्यास ते पुन्हा वापरात येणे शक्य आहे. मात्र, याकडे विद्यमान जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी गांभीर्याने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. जिल्हा क्रीडा संकुलामधील वसतिहांवर लावण्यात आलेले संयंत्र नादुरूस्तीमुळे बंद पडून असल्याने सद्या वसतिगृहात विद्यूत विभागाकडून पुरविल्या जाणारी वीज वापरली जाते. दुसरीकडे सौरऊर्जा संयंत्र दुरूस्त करण्यासाठी लागणार्या निधीची गेल्या २ वर्षांंपासून तरतूदच नसल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. *कर्मचार्यांअभावी उद्भवल्या समस्यावाशिमचे तत्कालिन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांची दोन महिण्यांपूर्वी येथून बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. अकोला येथील जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्याकडे सद्या या पदाचा प्रभार असून तेही नियमित येत नाहीत. याशिवाय क्रीडा अधिकारी मिलींद काटोलकर यांची बदली झाली आहे. मात्र, त्यांना ह्यरिलिवरह्ण नसल्यामुळे ते वाशिममध्येच अडकून आहेत. राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, उर्वरित एक कोच आणि दोन कारकून एवढय़ा तुटपूंज्या कर्मचार्यांवरच क्रीडा अधिकारी कार्यालयाचा सद्या कारभार सुरू आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परिसरातील खेळाडूंच्या वसतिहावर लावण्यात आलेल्या सौरऊर्जा संयंत्रांची पाहणी केली जाईल. क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे देखभाल-दुरूस्तीसाठी लागणार्या निधीची तरतूद आहे किंवा नाही, याचीही चाचपणी केली जाईल. याशिवाय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परिसरातील वसतिगृहाला सौरयंत्राची गरज नसेल तर हे संयंत्र दुरूस्त करून इतर प्रशासकीय कार्यालयावर प्रस्थापित करता येईल काय, यासंदर्भात निश्चितपणे निर्णय घेवू. - राहुल व्दिवेदीजिल्हाधिकारी, वाशिम
क्रीडांगणाच्या वसतिगृहावरील सौरऊर्जा संयंत्र निकामी!
By admin | Published: September 27, 2016 2:20 AM