वाशिम, दि. २३- जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा क्रीडांगणातील वसतिगृहावर असलेले सौरऊर्जा संयंत्र आजमितीस बंद पडले आहे. यामुळे या कार्यालयांना पुन्हा पारंपरिक ऊर्जास्रोतांचाच आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे. लाखो रुपये खचरून काही वर्षांंंंपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर आणि क्रीडांगणातील वसतिगृहावर सौरऊर्जा ह्यपॅनेलह्ण बसविण्यात आले होते; मात्र नियमित देखभाल, दुरुस्तीअभावी हे संयंत्र बंद पडले आहेत. ते पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सौरऊर्जा संयंत्र पडले बंद
By admin | Published: October 24, 2016 2:26 AM