कारंजा लाड (वाशिम) : मृत्यूची चौकशी करून दोषींविरूद्ध गुन्हे दाखल करावे, सुनील यांना शहीद घोषित करावे अशी मागणी करतानाच, शवविच्छेदन अहवाल प्राप्त होईपर्यंत जवान सुनील धोपे (३७) यांचे पार्थिव ताब्यात घेण्यास धोपे कुटुंबीयांनी मंगळवारीदेखील नकार दिला. जवानाचे पार्थिव ह्यबीएसएफह्णच्या ताब्यात असून, व्यापाऱ्यासह सर्वपक्षीयांनी मंगळवारीही कारंजात कडकडीत बंद पाळला.कारंजा येथील रहिवासी तथा मेघालय राज्यातील सिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत जवान सुनील विठ्ठलराव धोपे (३७) यांचा १५ सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान मृत्यू झाला. भारतीय तिरंग्यात झाकलेले त्यांचे पार्थिव १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कारंजात आणण्यात आले. यावेळी कुटुंबियांसहीत नातेवाईकांनी सुनील यांचा मृत्यू कशामुळे झाला, मृत्यूस कारणीभूत असणाऱ्याविरूद्ध गुन्हे दाखल करावे, शवविच्छेदन अहवाल प्राप्त होईपर्यंत पार्थिव ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत याच भूमिकेवर धोपे कुटुंबीय ठाम होते. सुनील धोपे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाºयांविरूद्ध गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी मंगळवारीदेखील व्यापारी, सामाजिक संघटनांसह सर्वपक्षीयांनी कडकडीत बंद पाळला.
जवानाच्या मृत्यूप्रकरणी दुसऱ्या दिवशीही कारंजा कडकडीत बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:24 PM