लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम तालुक्यातील वारा जहॉगीर, देपूळ परिसरातील वीजपुरवठा खंडीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीजपूरवठा पूर्ववत करावा, कृषीपंप जोडणी द्यावी यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरीमहावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर मंगळवारी धडकले.वारा जहॉगीर, देपूळ येथे बरेच दिवसांपासून वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त असून, विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही व्यत्यय निर्माण झाला आहे. वीजपुरवठा बंद असल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प आहे तसेच पिठाची गिरणी व शेतातील मोटारपंप बंद असल्याने गावकºयांचे नुकसान होत आहे. खरिप हंगामात शेतकºयांना तोटा सहन करावा लागला आणि आता रब्बी हंगामातही सिंचन करण्यात व्यत्यय निर्माण झाला आहे. वीजपुरवठा पूर्ववत करावा तसेच भारनियमन घेण्यात येऊ नये अशी मागणी डिगांबर खोरणे यांच्यासह गावकºयांनी अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तसेच तोंडगाव परिसरातील १० ते १२ गावांत जादा विद्युत भारनियमन घेतले जात असल्याने परिसरातील जनता त्रस्त आहे. भारनियमनामुळे पाणीपुरवठा योजनाही काही प्रमाणात प्रभावित होत आहेत. प्रलंबित कृषीपंप जोडणीचा प्रश्न अद्याप निकाली निघाला नाही. त्यामुळे रब्बी हंगामात सिंचन कसे करावे, या चिंतेने शेतकºयांची झोप उडाली आहे. तोंडगाव परिसरातील विजविषयक समस्या तातडीने निकाली काढाव्या, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा वाशिम बाजार समितीचे प्रशासक मंडळातील सदस्य चरण गोटे यांनी केली.
विजविषयक समस्या निकाली काढण्यासाठी शेतकरी धडकले महावितरणच्या कार्यालयावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 3:46 PM