बद्धकोष्ठता, मूळव्याध, अपचन, जास्तीचे वजन अशा प्रकारच्या आरोग्याच्या समस्यापासून मुक्तीसाठी डॉक्टरदेखील ज्वारीची भाकरी खाण्याचा सल्ला देत आहेत. रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी खा असे सांगितले जाते. पाच-दहा वर्षे मागे गेलो तर गहू खाणे प्रतिष्ठेचा विषय बनला होता. आज ज्वारीपेक्षा गव्हाची किंमत प्रतीकिलोमागे पाच रुपयांनी कमी असल्यामुळे तो गरिबांचा मुख्य आहार बनला. आता ज्वारीची भाकर खाणे ही चैनीची व प्रतिष्ठेची बाब बनत चालली आहे.
-----------------
अशी वाढली ज्वारीची श्रीमंती (प्रति क्विंटल दर)
वर्ष - ज्वारी - गहू
२०१६ - १६१० - १६२५
२०१७ - १७२५ - १७३५
२०१८ -१९१० -१८४०
२०१९ - २०२० -१९२५
२०२० - २२१० -२१८५
२०२१ - २५५० - २४००
-------------------------
ज्वारी परवडायची म्हणून खायचो
१) कोट: पूर्वी गहू खूप महाग होता. त्यामुळे सणालाच पोळ्या घरी व्हायच्या. आता ज्वारी महाग झाल्याने गहू खावा लागत आहे.
-डिगांबर पाटील उपाध्ये,
----------------------
२) कोट: साधारणत: १० ते १५ वर्षांपूर्वी ज्वारीचे दर खूप कमी होते. ती खाणे परवडत असे; परंतु आता ज्वारी खूप महागल्याने गव्हाच्या पोळ्या खात आहोत.
- नंदकुमार तोतला.
----------------
आता चपातीच परवडते...
१) कोट: पूर्वी ज्वारी स्वस्त: होती, आता हायब्रीड ज्वारीचे दरही २५ रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे गव्हाच्या चपात्या खाणेच आम्हाला परवडत आहे.
-नितीन उपाध्ये
---------
२) कोट: ज्वारीच्या तुलनेत आता गहू स्वस्त झाला आहे. ज्वारीची भाकरी आवडत असली तरी, ज्वारी महागल्याने आता आम्हाला चपात्या खाणेच परवडत आहे.
- अशोक थेर
---------------
आपल्या आरोग्याची श्रीमंतीही ज्वारीतच....
१ - ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. ज्यांना अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनी आहारात ज्वारीचा समावेश करावा. ज्वारीच्या सेवनामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही. किडनीस्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तीने आहारात ज्वारीचा समावेश केल्यास, पोषक तत्त्वांमुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते. ज्वारीची भाकरीच नव्हे तर ज्वारीच्या इतर पदार्थांचाही आहारात समावेश करावा.
२ - ज्वारीमध्ये लोह तत्त्वसुद्धा मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे एनिमियाचा त्रास असलेल्या व्यक्तीने आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केल्यास त्यांना फायदा होतो. फास्ट फूड आणि जंक फूड खाण्यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजार उद्भवतात. आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते आणि लठ्ठपणा कमी होतो.
३ - मिनरल्स, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम हे प्रमुख तीन घटक ज्वारीमध्ये असल्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयासंबंधीचे आजार नियंत्रित राहतात. ज्वारीमुळे रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. हृदयरोग होण्यापासून वाचायचे असेल तर ज्वारीची भाकरी तुम्ही खायलाच हवी.
४ - ज्वारीच्या सेवनामुळे मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या उद्भवत नाहीत. त्यामुळे अशा समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला आहारात ज्वारीचा समावेश करायलाच हवा. शरीरातले इन्शुलीनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी ज्वारी अत्यंत गुणकारी ठरते. त्यामुळे मधुमेहींनी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा.
----
जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घटले
बदलत्या काळात जिल्ह्यातील मुख्य पिकांखालील क्षेत्रातही कमालीचे फेरबदल घडले आहेत. गत पाच वर्षांत खरी व रब्बी ज्वारीच्या पेऱ्यात कमालीची घट झाली आहे. दहा वर्षांपूर्वी २०१०-११ मध्ये जिल्ह्यात खरीप ज्वारीचे क्षेत्र २२ हजार हेक्टर होते. आजच्या घडीला केवळ ३०० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी होत असल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.
-----
असे घटले ज्वारीचे क्षेत्र
२०१७- १२००
२०१८ - १०५०
२०१९- ७९०
२०२०- ४८०
२०२१- ३६५