लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जूनच्या सुरुवातीला जोरदार पाऊस पडल्यानंतर १० जूनपासून पावसाने उघडीप घेतली असल्याने आधीच्या पेरण्या संकटात असतानाही काही शेतकरी अद्यापही पेरणीची घाई करीत असल्याचे चित्र वाशिम तालुक्यात पाहायला मिळत आहे. तालुक्यातील दगड उमरा परिसरात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने येथील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत.कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात ४ लाख ६ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित केली आहे. तथापि, जमिनीची धूप कमी होऊन पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन त्यांच्याकडून शेतकºयांना करण्यात आले आहे; परंतु जूनच्या पूर्वार्धात १० जूनपर्यंत आलेल्या जोरदार पावसानंतर जिल्ह्यतील ३० टक्के क्षेत्रावर पेरण्या उरकल्या आहेत. आता आठ दिवसांपासून पावसाने खंड दिल्यामुळे आधीच्या पेरण्या संकटात असल्या तरी, वाशिम तालुक्यात शेतकºयांकडून पेरणीची घाई सुरू आहे. प्रामुख्याने सोयाबीन, मुग, उडिद या पिकांच्या पेरणीवर शेतकºयांचा सद्यस्थितीत अधिक भर असला तरी, तूर आणि कपाशीची पेरणीही बºयापैकी झालेली आहे. जमिनीची धूप कमी न झाल्यामुळे भेगा पडून अंकूर सुकत आहेत. काही शेतकºयांनी दक्षता बाळगून पेरण्या स्थगित केल्या आहेत. दरम्यान, वाशिम तालुक्यातील दगड उमरासह परिसरात इतर भागाच्या तुलनेत चांगला पाऊस झाला असून, जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकºयांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
वाशिम तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पेरणीची घाई सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 3:17 PM
वाशिम: जूनच्या सुरुवातीला जोरदार पाऊस पडल्यानंतर १० जूनपासून पावसाने उघडीप घेतली असल्याने आधीच्या पेरण्या संकटात असतानाही काही शेतकरी अद्यापही पेरणीची घाई करीत असल्याचे चित्र वाशिम तालुक्यात पाहायला मिळत आहे.
ठळक मुद्देजूनच्या पूर्वार्धात १० जूनपर्यंत आलेल्या जोरदार पावसानंतर जिल्ह्यतील ३० टक्के क्षेत्रावर पेरण्या उरकल्या आहेत. तालुक्यातील दगड उमरा परिसरात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने येथील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत.आता आठ दिवसांपासून पावसाने खंड दिल्यामुळे आधीच्या पेरण्या संकटात असल्या तरी, वाशिम तालुक्यात शेतकºयांकडून पेरणीची घाई सुरू आहे.