लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: खरीप हंगामात पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त होत असून, त्याअनुषंगाने सर्वेक्षण केले जात आहे. २२ जूनपर्यंत जवळपास १०० तक्रारी प्राप्त झाल्या. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे लवकर आगमन झाले. १० ते १६ जूनदरम्यान बºयापैकी पाऊस झाल्याने ८० टक्क्यापेक्षा अधिक शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या. दरम्यान, जेथे जमिनीत चार इंच ओलावा नाही किंवा ८० मीमी पेक्षा कमी पाऊस झाला तेथे शेतकºयांनी पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. ज्या महसूल मंडळात ८० मीमी पेक्षा कमी पाऊस झाला तेथेही अनेक शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ४ लाख ६ हजार २३४ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी २२ जूनपर्यंत ८० टक्के पेरणी उरकली आहे. पेरणीनंतर ८, ९ दिवसांपासून पाऊस नाही. त्यामुळे पेरलेले बियाणे उगवले नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. घरगुती बियाणे, उत्पादक कंपन्यांचे बियाणे तसेच महाबिजचेही बियाणे उगवले नसल्याच्या जवळपास १०० शेतकºयांच्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांमार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाºयांकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय कृषी अधिकारी, महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, कृषी सहायक आदींचा समावेश असलेल्या चमूच्यावतीने घटनास्थळी भेट देऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणाअंती वरिष्ठांकडे सविस्तर अहवाल पाठविला जाणार आहे. शेतात पेरलेले बियाणे उगवले नसल्यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्यामार्फत शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. आतापर्यंत जवळपास १०० शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यानुसार कृषी विभागातर्फे सर्वेक्षण केले जात आहे.- एस.एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम
पेरलेले बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांसमोर आर्थिक पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 4:23 PM