----
कुत्र्यांच्या हल्ल्यात माकड ठार
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे सोमवारी माकडांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये एक माकड गंभीर जखमी झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वन्यजीवप्रेमींनी हे माकड वन विभागाच्या हवाली केले.
----------
सर्पमित्रांकडून नागाला जीवदान (16६ँ36)
वाशिम: मानोरा तालुक्यातील अभयखेडा येथे सोमवारी निरंजन राऊत यांच्या घरात आढळून आलेल्या नागाला सर्पमित्रांनी पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. शिवा भेंडे, विकास भगत यांनी हा साप पकडला.
----------
कारंजा आणखी २८ कोरोनाबाधित
वाशिम: कारंजा तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यात मंगळवारी आरोग्य विभागाच्या अहवालानुसार शहरातील दोन व्यक्तींसह ग्रामीण भागांतील २६ व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले आहे.
------------
उंबर्डा येथे सात बाधित
उंबर्डा बाजार: ग्रामीण भागांत कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यात उंबर्डा बाजार येथे मंगळवारी ७ नवे कोरोनाबाधित आढळून आले. आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालावरून ही बाब स्पष्ट झाली आहे.
-------------
इंझोरीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
इंझोरी: नानाजी कृषी संजवनी प्रकल्पांतर्गत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले जात आहे. त्यात इंझोरी येथे तालुका कृषी अधिकारी विनोद घोडेकर यांच्या निर्देशानुसार कृषी सहायकांनी शेतकऱ्यांना योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
-------
जलसंधारणाच्या कामांची पाहणी
धनज बु.: कारंजा तालुक्यात समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत जलसंधारणाची कामे केली जात आहेत. यासाठी मंगळवारी जानोरी येथे कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनच्या समन्वयकांनी पूर्वी झालेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली.
---------------
कामरगावात आरोग्य तपासणी
कामरगाव: आरोग्य विभागाच्या अहवालानुसार कामरगावात मंगळवारी एका व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तालुका आरोग्य विभागाने गावात मंगळवारपासूनच आरोग्य तपासणीला सुरुवात केली.