लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सतत तेजी येत आहे. शासनाने या शेतमालास ३८८० रुपये हमीभाव घोषीत केले असताना बाजारात सद्यस्थितीत या ४ हजार ते ४ हजार ४०० रुपयांपर्यंतचे दर मिळत आहेत. आठवडाभर हे दर स्थीर राहणार असले तरी सोयाबीन उत्पादक असलेल्या ब्राझील, अमेरिका आणि चीनमध्ये या शेतमालाचे उत्पादन घटल्याने पुढे सोयाबीनचे दर वाढून ४ हजार ७०० रुपये प्रती क्विंटल पोहोचण्याच शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर परिणाम झाला. या पिकाची आवक घटल्याने गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात मोठी तेजी आली आहे. बाजारात ४ हजार ते ४ हजार ४०० रुपये प्रती क्विंटलने सोयाबीनची खरेदी होऊ लागली. आता पावसाने उंसत घेतल्यानंतर सोयाबीनची आवक बाजारात वाढू लागली आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसांत या शेतमालाच्या दरात २०० रुपयापर्यंत घट येण्याची शक्यताही व्यापाऱ्यांनी वर्तविली. तथापि, ही स्थिती आठवडाभर किंवा दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ राहणार नसून, आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझील, अमेरिका आणि चीनमधून सोयाबीनची मागणी होत असल्याने या शेतमालाच्या दरात पुढे वाढ होण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे दर ४ हजार ७०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतही पोहोचण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे व्यापाºयांकडून सांगितले जात आहे.
सोयाबीनच्या दरात आणखी तेजीची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 5:33 PM
Soyabean rates likely to rise सोयाबीनचे दर ४ हजार ७०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतही पोहोचण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात मोठी तेजी आली आहे. ४ हजार ते ४ हजार ४०० रुपये प्रती क्विंटलने सोयाबीनची खरेदी होऊ लागली.