यावर्षी सोयाबीन बियाणे स्थिती लक्षात घेता तसेच शेतकऱ्यांचा पेरणीखर्च कमी करण्याच्या दृष्टीने काजळेश्वर येथे मोजक्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सोयाबीन उगवण क्षमताबाबत प्रात्यक्षिक सभा घेण्यात आली. तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी यांनी सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक एस. एम. तोटावार यांनी सांगितलेल्या अष्टसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. कृषी साहाय्यक चंदन राठोड यांनी ओल्या गोणपाटावर १०० सोयाबीनचे दाणे टाकून उगवणक्षमता कशी काढावी, याचे प्रात्याक्षिक करून दाखविले. कृषी साहाय्यक कैलास घाटगे यांनी बीबीएफ पद्धतीने पेरणी करण्याचे फायदे उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले व घरचेच बियाणे पेरणीकरिता ठेवण्याचे आवाहन केले. कृषी पर्यवेक्षक शिंदे, कृषी विभागाचे देवानंद उपाध्ये यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संदीप परवाले यांनी तर नकुल उपाध्ये यांनी आभार मानले.
सोयाबीन बियाणे उगवणक्षमता तपासणी प्रात्यक्षिक सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:43 AM