लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या निर्णयानुसार १ आॅक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत बाजार समित्यांकडे सोयाबीन विकणाºया शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी प्रस्तावांची पडताळणी केल्यानंतर एकूण ४५ हजार ४३३ शेतकºयांचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत पणन संचालकांकडे पाठविण्यात आले असून, या लाभार्थी शेतकºयांच्या थेट बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. त्याबद्दलचे एसएमएसही त्यांना प्राप्त होणार आहेत. येत्या दोन-चार दिवसांत हे अनुदान प्राप्त होईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकांनी रविवारी दिली.शासनाने मागील वर्षीच्या खरीप हंगामात बाजार समितीत १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत सोयाबीन विकणाºया शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपये आणि कमाल २५ क्विंटलपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भातील प्रस्ताव शेतकºयांकडून मागवून जिल्हा उपनिबंधकांमार्फत पणन संचालकांकडे या महिन्याच्या सुरुवातीला पाठविण्यात आले आहेत. या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४५ हजार ४३३ शेतकरी अनुदानासाठी पात्र असून, या शेतकºयांनी १ आॅक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत बाजार समित्यांक डे विकलेल्या एकूण ७ लाख ३९ हजार ५६७ क्विंटल ९६ किलो सोयाबीनच्या अनुदानासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला १४ कोटी ७९ लाख १३ हजार, ५९२ रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.जिल्हा उपनिबंधकांनी पाठविलेल्या प्रस्तावांची पडताळणी करून पणन संचालकांमार्फत शेतकºयांना वितरित करण्यासाठी अनुदान मंजूर झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत ते अनुदान शेतकºयांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे.शासनाच्या निर्णयानुसार बाजार समित्यांमध्ये १ आॅक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ दरम्यान सोयाबीन विकणाºया शेतकºयांना अनुदान देण्यासाठी अंतिम प्रस्ताव पणन संचालकांकडे पाठविले आहेत. येत्या चार दिवसांत अनुदान प्राप्त होणार असून, ते थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम
सोयाबीन अनुदान थेट शेतक-यांच्या खात्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:38 AM
वाशिम: शासनाच्या निर्णयानुसार १ आॅक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत बाजार समित्यांकडे सोयाबीन विकणाºया शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे‘एसएमएस’द्वारे मिळणार माहिती वाशिम जिल्ह्यात ४५,४३३ लाभार्थी