वाशिम: जिल्ह्यातील शिरपूरजैन येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानच्या वतीने नव्या वर्षातील पहिल्या रविवारी, ७ जानेवारी रोजी दहाव्या अंतरिक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवात राज्यभरातील हजारोंच्या संख्येत श्वेतांबर जैन समाजबांधव सहभागी होणार आहेत, अशी माहिती शनिवारी आयोजकांतर्फे देण्यात आली.श्री अंतरिक्ष तिर्थरक्षक युग प्रधान आचार्यसम पंन्यासप्रवर श्री चंद्रशेखर विजयजी महाराज यांचे परमशिष्य रत्न तथा श्री अंतरिक्ष तिर्थ अभ्युदयपे्ररक पंन्यासप्रवर श्री विमलहंस विजयजी महाराज व प्रंन्यासप्रवर परमहंस विजयजी महाराज, मुनीश्रीश्री श्रमणहंस विजयजी, मुनीश्री अर्हमशेखर विजयजी महाराज आदिंच्या प्रमुख उपस्थितीत अंतरिक्ष महोत्सव होत असून यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी ९ वाजता श्री विघ्नहर पार्श्वनाथ भगवंतांची अष्टप्रकारे पुजा पार पडल्यानंतर अंतरिक्ष महोत्सवास रितसर सुरूवात होईल. पं्रन्यास प्रवर श्री विमलहंस विजयजी महाराज यांच्या प्रवचनाचा लाभ भाविकांना मिळणार असून श्वेतांबर जैन समाज बांधवांनी दहाव्या अंतरिक्ष महोत्सवात सहकुटूंब, नातेवाईकांसोबत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिरपूर जैन येथे ७ जानेवारीला अंतरिक्ष महोत्सव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 2:48 PM
वाशिम: जिल्ह्यातील शिरपूरजैन येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानच्या वतीने नव्या वर्षातील पहिल्या रविवारी, ७ जानेवारी रोजी दहाव्या अंतरिक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देमहोत्सवात राज्यभरातील हजारोंच्या संख्येत श्वेतांबर जैन समाजबांधव सहभागी होणार आहेत.सकाळी ९ वाजता श्री विघ्नहर पार्श्वनाथ भगवंतांची अष्टप्रकारे पुजा पार पडल्यानंतर अंतरिक्ष महोत्सवास रितसर सुरूवात होईल. यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.