लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत नियोजित विषयांप्रमाणेच प्रमुख १२ मुद्यांवर विशेष चर्चा करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी गटविकास अधिकाऱ्यां सह ग्रामसेवकांना दिल्या. ग्रामपंचायतच्या कराचा भरणा करणाऱ्या नागरिकालाच या ग्रामसभेत तक्रार नोंदविता येणार आहे. ग्रामसभा न घेणाºया ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांविरूद्ध योग्य ती कार्यवाही करण्याचा इशाराही मीना यांनी दिला.१५ आॅगस्ट रोजी प्रत्येक ग्राम पंचायतने ग्रामसभा घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने यापूर्वीच दिल्या आहेत. या ग्रामसभेत विषय सूचीतील विषयांबरोबरच अन्य १२ मुद्यांवरही चर्चा घडवून आणावी लागणार आहे. घरकुल योजनेच्या प्रपत्र ड यादीचे वाचन करणे, घरकुलाकरीता जागा उपलब्ध नसलेल्या घरकुल लाभार्थींचे अतिक्रमण नियमानुकूल करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे परिपत्रक वाचन करणे व लाभार्थी निवड करणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे परिपत्रक वाचन व लाभार्थी निवड, शाळा, अंगणवाडी केंद्रात उपलब्ध पाणीपुरवठा व स्वच्छता तसेच सर्व मुलभूत सुविधांबाबत चर्चा करणे, दिव्यांग लाभार्थी नोंदणी व त्यांना द्यावयाचा लाभ, ग्रामपंचायत कराचा भरणा, पशुसंवर्धन विभागांतर्गत ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे, ७५ टक्के अनुदानावर शेळी गटाचा पुरवठा करणे तसेच अन्य योजना व लाभार्थी अर्जांसंदर्भात चर्चा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृती आराखडा व लेबर बजेट, माझी कन्या भाग्यश्री योजनेचे सुधारीत शासन निर्णयाचे वाचन, पोषण अभियानासंदर्भात जागृती अभियान राबविणे, ग्रामपंचायत विकासाबाबतचे इतर आवश्यक विषय आदींवर या ग्रामसभेत चर्चा घडवून आणावी लागणार आहे.शासकीय योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी या योजनेची सविस्तर माहिती, अर्ज प्रक्रिया, लाभार्थी निवड प्रक्रिया आदींची माहिती ग्रामस्थांना द्यावी, अशा सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी दिल्या.
१५ आॅगस्टच्या ग्रामसभेत होणार १२ मुद्यांवर विशेष चर्चा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 4:24 PM
वाशिम - १५ आॅगस्ट रोजी होणाºया ग्रामसभेत नियोजित विषयांप्रमाणेच प्रमुख १२ मुद्यांवर विशेष चर्चा करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी गटविकास अधिकाºयांसह ग्रामसेवकांना दिल्या.
ठळक मुद्दे१५ आॅगस्ट रोजी प्रत्येक ग्राम पंचायतने ग्रामसभा घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने यापूर्वीच दिल्या आहेत. ग्रामसभेत विषय सूचीतील विषयांबरोबरच अन्य १२ मुद्यांवरही चर्चा घडवून आणावी लागणार आहे.