लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत इमारत व इतर बांधकाम क्षेत्राशी निगडीत तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत व इतर इमारत बांधकाम क्षेत्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे. याकरिता १ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शेलूबाजार ग्राम पंचायत येथे विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आल्याचे सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मागील १२ महिन्यामध्ये ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्या १८ ते ६० वर्ष वयोगटातील मजुरांची नोंदणी कामगार म्हणून करता येणार आहे. कामगार नोंदणीसाठी वयाबाबतचा पुरावा, मागील वर्षातील ९० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकारातील ३ रंगीत फोटो, रहिवासी पुरावा, फोटो असलेले ओळखपत्र, बँक पासबुकची झेरोक्स आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. कामगार म्हणून नोंदणी केल्यानंतर सदर कामगारांना भविष्यात मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. जिल्ह्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्राशी निगडीत मजुरांसह महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत (वृक्ष लागवड व रोपवाटिका ही कामे वगळून) काम करणाºया मजुरांनी शिबिरामध्ये सहभागी होऊन कामगार म्हणून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
कामगार नोंदणीसाठी रविवारी विशेष अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 7:59 PM
वाशिम : जिल्ह्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत इमारत व इतर बांधकाम क्षेत्राशी निगडीत तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत व इतर इमारत बांधकाम क्षेत्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे. याकरिता १ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शेलूबाजार ग्राम पंचायत येथे विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आल्याचे सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
ठळक मुद्देमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाबांधकाम क्षेत्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी करणार