ऑनलाइन लोकमतवाशिम. दि. ७ : जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून जिल्ह्यात सुरु असलेली सर्व विकास कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करून कामांना गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हषर्दा देशमुख, कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे आमदार लखन मलिक, रिसोडचे आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक ए. एम. यावलीकर यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे अशासकीय सदस्य व विविध अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेला निधी खर्च करताना प्रत्येक विभागाने सुनियोजितपणे कामे पूर्ण करावीत. जिल्हा वार्षिक योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीसाठी निधी देण्यात आला आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कायर्कारी अभियंता यांनी समन्वयाने काम करून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामांना गती द्यावी. या कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. तसेच कारंजा येथील ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाची माहिती पालकमंत्री डॉ. पाटील यांनी घेतली. ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून लवकरच ही इमारत पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कायर्कारी अभियंता के.आर. गाडेकर यांनी यावेळी दिली.कारंजा तालुक्यातील सावरगाव येथील रस्ता रखडल्याचा मुद्दा आमदार राजेंद्र पाटणी यांनी बैठकीमध्ये उपस्थित केला. यावेळी पालकमंत्री डॉ. पाटील यांनी वन विभागाच्या अधिका?्यांकडून याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच या रस्त्याचे काम सुरु करण्यामध्ये होत असलेल्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्ती केली. रस्त्याचे काम तातडीने मार्गी न लागल्यास याप्रकरणी जिल्हाधिका?्यांनी चौकशी करून कोणत्या विभागामुळे रस्त्याच्या कामात दिरंगाई झाली, याचा अहवाल सादर करावा, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले. जिल्हा नियोजन योजनेतून निधी मिळालेली व अद्याप सुरु न झालेल्या, तसेच निर्माणाधीन असलेल्या रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र यासह इतर विविध इमारतींच्या बांधकामांचा सद्यस्थिती अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ. पाटील यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिले. यावेळी पालकमंत्री डॉ. पाटील यांनी विविध विभागांनी सादर केलेल्या अनुपालन अहवालाचा व सन २०१५-१६, सन २०१६-१७ मधील निधी खर्चाचा आढावा घेतला. सर्वप्रथम जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी यांनी मंजूर नियतव्यय व प्रत्यक्ष खर्चाची माहिती दिली. ते म्हणाले की, सन २०१५-१६ मध्ये सवर्साधारण, अनुसूचित जाती व आदिवासी उपयोजना यामधून एकूण १९७ कोटी ३७ लक्ष ८३ हजार निधी प्राप्त झाला होता यापैकी १९७ कोटी ३६ लक्ष रुपये निधी वितरीत करण्यात आला होता. यापैकी १९२ कोटी रुपये २७ लक्ष ४४ हजार रुपये म्हणजेच ९७.४२ टक्के निधी खर्च झाला. तसेच सन २०१६-१७ मध्ये १७८ कोटी ६२ लक्ष ६७ हजार रुपये निधी अथर्संकल्पित करण्यात आला आहे. यापैकी १३६ कोटी ३९ लक्ष ९० हजार रुपये निधी प्राप्त झाला असून ४८ कोटी ६५ लक्ष २५ हजार रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे.