जिल्ह्यात साधारणत: एप्रिल २०२० या महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाला सुरुवात झाली. तेव्हापासून १० जुलैपर्यंत ४१ हजार ५५६ कोरेानाबाधित रुग्ण निष्पन्न झाले. त्यातील ६२२ जणांचा संसर्गाने मृत्यू झाला. दरम्यान, संसर्गाची तिसरी लाटही येण्याची शक्यता गृहीत धरून त्यापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीची पाऊले उचलत लसीकरण मोहिमेस वेग दिला आहे. ४ ते ७ जुलै या कालावधीत २० हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मात्र, ८ जुलैपासून लसींचे डोस शिल्लक नसल्याने मोहीम प्रभावित झाली आहे.
..................
कोट :
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेस वेग देण्यात आला आहे. संपूर्ण जिल्हा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. मात्र, अधूनमधून लसींचा तुटवडा निर्माण होत असल्याने मोहीम प्रभावित होत आहे. असे असले तरी शनिवारी कोविशिल्डचे ५७०० आणि कोव्हॅक्सिनचे ५६०० डोस प्राप्त झाले असून सोमवारपासून मोहीम पुन्हा वेगवान केली जाईल.
- डाॅ. अविनाश आहेर.
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.