या कार्यक्रमांमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालय, आर्ट ऑफ लिव्हिंग, नेहरू युवा केंद्र, भाजप युवा मंच, कामगार कल्याण मंडळ, न्यू वर्ल्ड स्कूल यांच्यासह जिल्हास्तरावरील सर्व संघटनांनी सहभाग नोंदविला. तसेच ऑनलाईन कार्यक्रमात देश-विदेश, आंतरराज्य आणि आंतर जिल्ह्यातून योग साधकांनी सहभाग नोंदविला. शिबिराला मुख्य मार्गदर्शक म्हणून भारत स्वाभिमान व पतंजलीचे जिल्हा कोषाध्यक्ष तथा योगतज्ज्ञ डॉ. भगवंतराव वानखडे, महिला पतंजलीच्या जिल्हा प्रभारी तथा योगतज्ञ दीपा वानखडे, डॉ. हरीश बाहेती, डॉ. सरोज बाहेती, देवीदास पाटील, योग शिक्षिका तारा कलवार, राजू कलवार, न. प. उपाध्यक्ष बापू ठाकूर, संगीता राजगुरू, नेहरू युवा केंद्राचे मेश्राम, सहयोग फाऊंडेशनच्या संगीता इंगोले, रूपाली देशमुख, सोनाली गर्जे, सुखदेव राजगुरू, अर्जुन चंदेल, नितीन घटमल, नगरसेवक राहुल तुपसांडे, गणेश खंडाळकर, रवी पाटील, तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष नीलेश सोमाणी यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. भगवंतराव वानखेडे, योग प्रशिक्षिका दीपा वानखेडे, तारा कलवार यांनी उपस्थितांचे योग व प्राणायामाचे धडे दिले.
आंतरराष्ट्रीय योग दिवस महोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:27 AM