लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: भारतीय नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा सणापासून होते. या औचित्यावर १८ मार्चला भारतीय नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील श्रीराम मंदिरापासून दुपारी ४ वाजता भव्य दुचाकी शोभायात्रा काढण्यात आली. त्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. याप्रसंगी झालेल्या ‘जय श्रीराम’च्या गजराने संपूर्ण वाशिम नगरी दुमदुमून गेली होती. वाशिम येथे विहिंप, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती, विश्वमांगल्य व बजरंग दल या सामाजिक संघटनांच्यावतीने भारतीय नववर्षाच्या स्वागतानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही यानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून, शोभायात्रेत मोटरसायल व सायकलस्वारांचाही समावेश होता. या शोभायाात्रेला स्थानिक श्रीराम मंदिरापासून प्रारंभ झाला. शोभायात्रेत वाशिम शहरातील माताभगिनी, युवती, युवा व समस्त नागरिक फेटे बांधून सहभागी झाले. विशेष सजविलेल्या रथावर भारतमातेची प्रतिमा, बुलेटस्वार फेटेधारी युवती हे शोभायात्रेचे वैशिष्ट्य ठरले. शोभायात्रेचा समारोप ग्राम आराध्य श्री बालाजी मंदिरात झाला.
भारतीय नववर्षानिमित्त निघाली उत्स्फूर्त दुचाकी रॅली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:52 AM
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: भारतीय नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा सणापासून होते. या औचित्यावर १८ मार्चला भारतीय नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील श्रीराम मंदिरापासून दुपारी ४ वाजता भव्य दुचाकी शोभायात्रा काढण्यात आली. त्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. याप्रसंगी झालेल्या ‘जय श्रीराम’च्या गजराने संपूर्ण वाशिम नगरी दुमदुमून गेली होती. वाशिम येथे विहिंप, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती, ...
ठळक मुद्देमहिलांचा लक्षणीय सहभाग: ‘जय श्रीराम’चा गुंजला गजर