जिल्ह्यातील ज्या युवकांना उद्योजक बनायचे आहे, अशांना दानिश एम्पायर व्यापारी संकुलाच्या माध्यमातून खास संधी उपलब्ध करण्यात येत असल्याचे देवेंद्र खडसे यांनी सांगितले. शहराच्या मध्यभागी असलेल्या या व्यापारी संकुलात दुकान घेऊन स्वत:चा उद्योग थाटण्याची संधी युवकांना मिळणार आहे. या व्यापारी संकुलात गेम झोन, पेशवाई सारीज, ड्रेस मटेरियल, हायपर मॉल, फॅमिली रेस्टॉरंट, मॉल, बूक्स स्टोअर्स, जिम सेंटर, गिफ्ट शॉप, कुशन शॉप, आर्टिफिशियल ज्वेलरी, कोकरी शॉप, ज्यूस सेंटर, कपड्याचे दुकान, युनिसेक्स सलून, स्वीट्स ॲण्ड नमकीन यांसह अनेक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दानिश एम्पायर हे व्यापारी संकुलाच्या रूपाने वाशिम शहरात भव्य प्रकल्प उभारण्यात आला आहे. तालुक्यातील व जिल्ह्यातील व्यावसायिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खडसे यांनी केले आहे. (वा.प्र.)
दानिश एम्पायर संकुलास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:40 AM