वाशिम येथील बांडे कोचिंग क्लासेसमध्ये आयोजित शिबिरात ३९ जणांनी रक्तदान केले, गोटे स्किन क्लिनिकमध्ये आयोजित शिबिरात २१ जणांनी रक्तदान केले, तर कारंजा येथील पंचायत समिती सभागृहात ८८ जणांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात हातभार लावला.
..........
कारंजातील रक्तदान शिबिरासाठी अनेकांचे सहकार्य
कारंजा येथील रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रज्ज्वल गुलालकरी, सर्वधर्म आपत्कालीन संस्था श्याम सवाई, भारती इचे, प्रा. सी. पी. शेकूवाले, प्राथमिक शिक्षक संघटना, महसूल संघटना, तलाठी संघटना, कृषी संघटना, पोलीस स्टेशन ग्रामीण व शहर, अभियंता एस. बी. पवार, रमेश देशमुख, विनित गोलेच्छा आदिंनी महत्त्वाची भूमिका वठविली. पोलीस कर्मचारी सुनील गजभार यांनी ८८ वे रक्तदान करून आपला वाढदिवस साजरा केला. रक्तदात्यांना कारंजा नागरी सहकारी पतसंस्थेकडून हँड बॅगचे वाटप राजाभाऊ डोणगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
---------------
मान्यवरांच्या भेटी
लोकमतकडून कारंजा येथे आयोजित रक्तदान शिबिरात, तहसीलदार धीरज मांजरे, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, तालुका कृषी अधिकारी सतोष वाळके, बीडीओ कालिदास तापी, बीईओ श्रीकांत माने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊसाहेब लहाने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण जाधव, नायब तहसीलदार सुनील हरणे, उपमुख्याधिकारी सोपनील खामकर, ठाणेदार गजानन धंदर, कारंजा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ डोंणगावकर, डॉ. राम गुंजाटे, डॉ. उल्हास काटोले, डॉ. अमोल उगले, भाजपाचे विजय काळे, युवा मोर्चा काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी दिलीप भोजराज, विजय गाढवे आदिंनी भेटी दिल्या.