वाशिम - वाशिम जिल्हा परिषदेतर्फे २८ ते ३० जानेवारीदरम्यान स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले असून, २८ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे.
विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या दौऱ्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक महोत्सव लांबणीवर पडला होता. २८ जानेवारीपासून प्रारंभ होणाºया या महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, सभापती सर्वश्री सुधीर पाटील गोळे, पानुताई जाधव, यमुना जाधव, विश्वनाथ सानप, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस यांची उपस्थिती राहणार आहे. अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील, एस.व्ही. इस्कापे, दिलीप इंगळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्यंकट जोशी, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी. गहेरवार, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद उके, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एम. खान, कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापात्रे, समाजकल्याण अधिकारी अमोल यावलीकर, उपअभियंता व्ही.एम. कोंडे यांच्यासह सहाही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांची उपस्थिती राहणार आहे. २८ ते ३० जानेवारीदरम्यान जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाºयांच्या मैदानी तसेच सांघिक स्पर्धा होणार आहेत तसेच सायंकाळनंतर सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा होणार आहे. ३० जानेवारी रोजी बक्षीस वितरण समारंभ होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख राहतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी क्रीडा मंडळाचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी केला.