लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा क्रीडा विभागाच्यावतीने क्रीडा संकुल परिसरात भव्य जलतरण तलावाची सुविधा जानेवारी महिन्यात उपलब्ध केली. त्यानंतर दोन महिन्याचा कालावधी हा निविदा प्रक्रियेत गेला. निविदा प्रक्रिया पूर्ण होत नाही; तर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी लागू झाली. त्यामुळे जलतरण तलावाही ‘लॉकडाऊन झाला.क्रीडा विभागाच्यावतीने स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल परिसरात विविध क्रीडा विषयक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील खेळाडूंना होत आहे. जानेवारी महिन्यात जलतरण तलाावाचे कामही पूर्ण झाल्याने खेळाडूंसह शहरवासियांना जलतरण तलावाची सुविधा उपलब्ध होणार होती. २५ जानेवारी रोजी या जलतरण तलावाचे लोकार्पणही झाले होते. सेमी आॅलिम्पिक म्हणजेच २५ मीटर लांबी व २१ मीटर रुंदी असलेला हा सुसज्ज जलतरण तलाव आहे. जलतरण तलावासंदर्भात फेब्रुवारी महिन्यात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये एका महिन्याच्या कालावधी गेला. निविदा प्रक्रिया पूर्ण होत नाही; तेच कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. जलतरण तलावाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परंतू, लॉकडाऊनमुळे जलतरण तलाव अद्याप सुरू होऊ शकला नाही.
जलतरण तलावासंदर्भात निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. कोरोना संसर्ग टाळणे आणि लॉकडाऊनच्या नियमावलीमुळे जलतरण तलाव सुरू होऊ शकला नाही. - प्रदीप शेटीये,जिल्हा क्रीडा अधिकारी, वाशिम