लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय क्रीड दिनी अर्थात २९ आॅगस्ट रोजी वाशिम येथे सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच अखिल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले असेल अशा खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस २९ आॅगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन दरवर्षी साजरा केला जातो. या दिवशी वाशिम येथे वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे. जिल्ह्यातील मान्यता प्राप्त खेळामध्ये राष्ट्रीय, अखिल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेल्या जिल्ह्यातील खेळाडूंनी खेळाच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत साक्षांकित करुन या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी २८ आॅगस्ट २०१९ रोजी संपर्क साधावा लागणार आहे. सत्कारमुर्ती खेळाडुंना २९ आॅगस्ट २०१९ रोजीच्या सन्मान सोहळ्यात निमंत्रित केले जाणार आहे. जिल्हयातील उपरोक्त पात्रताप्राप्त खेळाडुंनी सत्काराकरिता नाव नोंदणी करण्याचे आवाहन वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकात उप्पलवार यांनी केले.
क्रीडा दिनी वाशिम येथे होणार खेळाडूंचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 5:28 PM