देशात मार्च, २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गााचा प्रादुर्भाव वाढला. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. जानेवारी महिन्यात यामध्ये आणखी घट येत असल्याचे दिसून येते. यामुळे लाॅकडाऊनच्या नियमात आणखी शिथिलता आणली जात आहे. याला क्रीडा क्षेत्रही अपवाद नाही. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील खुल्या जागेत राज्य शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाने प्रसिद्ध केलेल्या ‘एसओपी’नुसार सर्व स्तरांवर खेळणाऱ्या खेळाडूच्या प्रशिक्षणासाठी संबंधित संस्था, संघटना १८ जानेवारीपासून सुरू करता येतील. खेळाच्या स्पर्धेचे व खेळासंबंधी इतर बाबींच्या संस्थांना, संघटनांना कोविड १९ संबंधी अटी, शर्तींचे पालन करून स्पर्धा आयोजित करता येतील. यापूर्वी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशातील अटी व शर्ती कायम राहणार आहेत. या निर्णयाला अनुसरून जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर क्रीडा प्रशिक्षण, स्पर्धा आयोजित करण्याला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी परवानगी दिली.
क्रीडा प्रशिक्षण, स्पर्धेच्या आयोजनास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:40 AM