शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

विनाकारण फिरणाऱ्यांची ‘ऑन द स्पॉट’ कोरोना चाचणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:42 AM

मंगरूळपीर : वारंवार सांगूनही शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची आता जागेवरच कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. ...

मंगरूळपीर : वारंवार सांगूनही शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची आता जागेवरच कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. त्यानुसार मंगरूळपीर येथे नगरपालिका, महसूल व पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवत २३ एप्रिल रोजी ९० जणांची रॅपिड अ‍ॅंटीजेन चाचणी केली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत नवीन नियमावलीची अंमलबजावणी केली जात आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांसह, पालिका प्रशासन वारंवार नागरिकांना आवाहन ही करीत आहे. मात्र, नागरिक काहीच देणे-घेणे नसल्यासारखे वागत आहेत. शहरात सकाळी ७ ते ११ वाजता पर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा दिली आहे. त्यामुळे सर्वत्र वर्दळ दिसून येते. त्यातून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुपारी १२ वाजता नंतर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर कुणालाही फिरण्यास मज्जाव घातला आहे. तरीही अनेकजण शहरात फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्यांकडून इतरांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना चाचणी केली जात आहे. शुक्रवारी पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पकडून त्यांची रॅपिड अ‍ॅंटीजेन चाचणी केली. जवळपास ९० जणांची चाचणी केली. यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी व नगरपरिषदेचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी उपविभागीय अधिकारी मुळे, नायब तहसीलदार कुुलकर्णी, ठाणेदार जगदाळे, आरोग्य निरीक्षक राजेश संगत नगरपरिषदेचे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ अजमल, डॉ जाधव व कर्मचारी उपस्थित होते. चाचणी केल्यानंतर सर्वांचे नाव पत्ता, मोबाईल नंबर व आधार नंबर घेऊन त्यांना सोडून देण्यात आले