लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वसंत ऋुतुची चाहूल लागतानाच आम्रवृक्ष फुलांनी (मोहोर) बहरून गेले आहेत. आंब्याच्या झाडांना पानागणिक मोहोराचे गुच्छ धरले असल्याने यंदा आंब्याचे उत्पादन भरघोस होणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून, गावराण आंब्याची चवही चाखायला मिळू शकणार असल्याचे दिसत आहे.वाशिम जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. अलिकडच्या काळात कलमी आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी, या जिल्ह्यात गावराण आंब्याचे प्रमाणही अद्याप लक्षणीय आहे. गत पावसाळ्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने ऋुतुचक्र ातील वातावरणात समसमानच राहिले. प्रत्येक ऋ तूत येणाºया पिकांना पोषक वातावरणाचा थोडाबहुत लाभही झाला. आॅगस्टमधील अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान वगळता नैसर्गिक आपत्तीचा फारसा फटका शेतकºयांना यंदा बसला नाही. अशाच पोषक वातावरणामुळे आता आम्रवृक्षही मोहराने लदबदले आहेत. शिशिर ऋ तुच्या उत्तरार्धात पानगळ सुरू होते आणि त्याच काळात आम्रवृक्षांना फुलधारणाही होते. आता वसंत ऋ तूची चाहुल लागल्यानंतर आम्रवृक्षाला लागलेला मोहोर फलधारणेच्या स्थितीत आहे. असून, सध्याचे पोषक वातावरण लक्षात घेता यंदा मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन होण्याची शक्यता असून, गावराण आंबाही सर्वसाधारण लोकांना चाखायला मिळणार असल्याचे दिसू लागले आहे.
वसंत ऋुतुची चाहूल; मोहराने लदबदले आम्रवृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 3:45 PM