लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय मंडळातर्फे धेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीचा निकाल बुधवार २९ जुलै रोजी जाहिर झाला असून, यामध्ये वाशिम जिल्हा ९६.०९ टक्क्यासह अमरावती विभागात द्वितीय स्थानावर आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्र्षीही मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे.जिल्ह्यातील ३०७ शाळांमधील ११ हजार ६३६ मुले व ९ हजार १२० मुली अशा एकूण २० हजार ७५६ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. यापैकी ११ हजार ५५९ मुले व ९ हजार ६६ मुली अशा एकूण २० हजार ६२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये १० हजार ९७७ मुले आणि ८ हजार ८४१ मुली असे एकूण १९ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण टक्केवारी ९६.०९ अशी आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९७.५२ असून मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.९६ आहे. जिल्ह्यात गतवर्षीप्रमाणे यावर्षीही दहावीच्या निकालात रिसोड तालुका प्रथम स्थानी असून, निकालाची टक्केवारी ९७.४९ आहे तर सर्वात कमी निकाल कारंजा तालुक्याचा ९४.८४ टक्के आहे.
SSC Result : वाशिम जिल्ह्याचा निकाल ९६.०९ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 4:31 PM