लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २८ मे रोजी जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक होती. त्याचप्रमाणे शनिवार, ८ जून रोजी जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालातही मुलींचीच सरशी झाली आहे. विभागीय निकालाच्या बाबतीत अमरावती विभागात वाशिम जिल्हा (७५.३१ टक्के) व्दितीय क्रमांकावर असून १४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे; तर दोन शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.वाशिम जिल्ह्यातील ३०१ शाळांमधील ११ हजार ४५० मुले व ८ हजार ९८२ मुली असे एकंदरित २० हजार ४३२ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २० हजार ८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ७ हजार ९०२ मुले आणि ७ हजार २२८ मुलींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली; तर १५ हजार १३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान, मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८१.६६ टक्के असून मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ७०.३२ टक्के आहे. जिल्ह्यातील १४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून वाशिम शहरातील लक्ष्मीनारायण इन्नाणी हायस्कूलमधील ८ विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली; मात्र एकही विद्यार्थी उत्तीर्ण होवू शकला नाही. तसेच कारंजा तालुक्यातील काळी कारंजा येथील मॉडर्न उर्दू हायस्कुलचा निकालही शून्य टक्के लागला आहे. जिल्ह्यात रिसोड तालुका ठरला अव्वल!दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या तुलनेत रिसोड तालुक्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी (८१.२७) अधिक असून हा तालुका अव्वल ठरला आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये वाशिम (७८.६२ टक्के), मालेगाव (६४.४० टक्के), कारंजा (७४.५८ टक्के), मंगरूळपीर (७३.३१ टक्के) आणि मानोरा तालुक्याचा निकाल ७२.०९ टक्के लागला आहे. ४०६१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत!दहावीची परीक्षा देणाºया जिल्ह्यातील २० हजार ८९ विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्ण झालेल्या १५ हजार १३० विद्यार्थ्यांमध्ये ४०६१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे; तर ६६२८ विद्यार्थी प्रथम आणि ३९९३ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
SSC Result 2019: मुलींचीच सरशी; वाशिम जिल्ह्याचा निकाल ७५.३१ टक्के!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 3:10 PM