मंगरुळपीर : मंगरुळपीर आगाराच्या बसेस वारंवार रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागत आहे. २ नोव्हेंबर रोजी मंगरुळपीर- अकोला- दिग्रस अशी प्रवाशांना घेवून जाणारी बस मंगरुळपीरच्या अकोला चौकात अचानक बिघडल्याने प्रवाशांना ते दुरुस्त होईपर्यंत ताटकळत बसावे लागले. याबाबत प्रवांशामध्ये महामंडळाविषयी रोष व्यक्त केल्या गेला.
दिग्रस डेपोची असलेली एम.एच.१४ बी.टी. ०६४१ या क्रमांकाची गाडी अकोल्यावरुन दिग्रसला जात असतांना मंगरुळपीर येथे बिघाड होवुन बंद पडली. हा प्रकार सर्रास होत असल्याने प्रवाशांमध्ये चिड निर्माण होत आहे. विश्वासाचा व सुखकर प्रवास म्हटल्या जाणाºया महामंडळाच्या प्रवासात आता पाहीजे तशी विश्वासार्हता राहीली नसुन प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या ब्रिदवाक्य आता बदलत आहे. महामंडळने प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी अशा नादुरुस्त बसेस हटवुन नविन बस ऊपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे प्रवाशांचे म्हणने आहे. मंगरुळपीर आगारातील बºयाचश्या बसेसही नादुरुस्त आहेत. अनेक वेळा प्रवाशांना प्रवासामधे ञास होतो. दोन नोव्हेंबर रोजी तिन वाजताचे दरम्यान दिग्रसला जाणारी गाडी अचानक बंद पडल्याने महामंडळवर प्रवाशांनी रोष व्यक्त केल्या. यामध्ये अनेक प्रवासी नियमित प्रवास करणारे असल्याने ही नेहमीचेच असल्याच्या प्रतिक्रीया प्रवाशांनी व्यक्त केल्यात.