शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
2
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
3
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
4
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
5
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
6
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
7
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
8
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
9
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
10
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
11
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
12
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
13
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
14
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
15
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
16
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
17
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
18
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
19
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
20
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ

एसटी कर्मचा-यांना बदलीसाठी ठिकाण निवडण्याची मुभा

By admin | Published: March 25, 2017 2:28 AM

तीन ठिकाणांसाठी पसंती क्रम देता येईल!

वाशिम, दि. २४- राज्य परिवहन महामंडळात कार्यरत वर्ग ३ कर्मचार्‍यांच्या बदल्यांसंदर्भात धोरण निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार एखाद्या पदावर ३ वर्षांंचा कालावधी पूर्ण करणार्‍या कर्मचार्‍यांची बदली करताना संबंधित कर्मचार्‍याला प्रशासकीय सोय विचारात घेऊन पसंतीनुसार ठिकाण निवडण्याचा अधिकार असणार आहे. या संदर्भातील परिपत्रक २२ मार्च रोजी जारी करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) ३ मे २0१४ रोजीच्या त्यांच्या परिपत्रकानुसार महामंडळातील अधिकारी / कर्मचार्‍यांच्या बदल्यासंबंधातील धोरण निश्‍चित करण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. सदर परिपत्रकातील सूचनेनुसार राज्य संवर्गीय कर्मचार्‍यांच्या नियतकालिक बदल्या करण्याबाबत महामंडळाच्या १0 एप्रिल २0१५ च्या परिपत्रकात सूचना देण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या परिपत्रकातील नमूद सूचनानुसार महामंडळाच्या वर्ग ३ राज्य संवर्गातील कर्मचार्‍यांसाठी एखाद्या पदावर असण्याचा सामान्य कालावधी तीन वर्षांंचा असेल. त्यानंतर त्याची बदली मार्च/एप्रिल महिन्यात करण्यात येईल. यासाठी सक्षम प्राधिकारी मार्च/ एप्रिलमध्ये पात्र होतील. अशा कर्मचार्‍यांची यादी डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात येईल. बदली पात्र कर्मचार्‍यांकडून तीन ठिकाणांसाठी पसंतीक्रम मागविण्यात येईल. तसेच त्यांची बदली करताना प्रशासकीय सोय विचारात घेऊन पसंती क्रमाचा विचार करण्यात येईल. एखाद्या ठिकाणासाठी एकापेक्षा अधिक कर्मचार्‍यांकडून पसंती क्रम प्राप्त झाल्यास अशा प्रकरणी कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र अभ्यास करून निर्णय घेण्यात येणार आहे. नियतकालिक बदल्यांसंदर्भात महामंडळाच्या परिपत्रकाची माहिती आहे. या परिपत्रकानुसार महामंडळातील वर्ग ३ कर्मचार्‍यांच्या

नियतकालिक बदल्या करताना तीन ठिकाणांसाठी पसंतीक्रम मागवावा लागणार आहे. -सचिन भा. क्षीरसागरविभागीय वाहतूक अधिकारी अकोला