समता फाउंडेशनच्या वतीने रिसोड शहरासाठी कोरोना प्रतिबंधित लसीकरण मोहिमेचे आयोजन ५ ते २७ जून यादरम्यान करण्यात आले होते. या लसीकरणासाठी शहरातील प्रत्येक संघटनेने तसेच रिसोड शहरातील पोलीस स्टेशनच्या वतीनेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करून लसीकरणासाठी शहरातील नागरिकांना प्रवृत्त केले होते. या मोहिमेत त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सतत सहकार्य केल्यामुळे त्यांचा समता फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार एस. एम. जाधव म्हणाले, रिसोड शहरासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवून आपल्या जन्मभूमीबद्दल किती मोठ्या प्रमाणात आस्था व प्रेम आहे हे समता फाउंडेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल यांनी दाखवून दिले. या सृष्टीवर अनेक श्रीमंत व उद्योगपती लोक आहेत. परंतु जन्मभूमी येथील नागरिकांना कोरोना आजारावर कसे प्रतिबंधित करता येईल हे अग्रवाल यांनी ही मोहीम राबवून दाखवून दिले.
समता फाउंडेशनच्या वतीने पोलीस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:26 AM