कारंजा तालुक्यातील पिंपळगाव आणि धोत्रा जहॉगिर येथे आयोजित कार्यक्रमात पाणी फाऊंडेशनच्या चमूने सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचाºयांना विहिर, कूपनलिकेची पातळी मोजण्याचे प्रशिक्षण देतानाच हंगामनिहाय पीक माहिती फॉर्म भरण्याबाबत मार्गदर्शन केले. या गावांत सोमवारपासून प्रत्यक्ष सर्वेक्षण होणार आहे.दरम्यान, काकडशिवणी गावाने सर्वेक्षण पूर्ण करून याबाबतची माहिती पाणी फाऊंडेशनच्या अॅपमध्ये अपलोड करण्यास सुरुवात केली आहे. मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत समृद्ध गाव स्पर्धेसाठी टप्पा ४ च्या प्रशिक्षणाला महिलांसह ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हंगाम निहाय पीक सर्वेक्षणाला महिलांनी उत्साहात सुरुवात केली. यामधे पिंपळखुटा महिला बचत गटाच्या प्रमुख वर्षा पडघान यांनी आपल्या संपूर्ण महिला टीमसह ओलीत तथा कोरडवाहू शेतीसह सुक्ष्म,तुषार, पाट पद्धतीच्या सिंचनाचे सर्वेक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला.
===Photopath===
070221\07wsm_1_07022021_35.jpg
===Caption===
समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत टप्पा ४ चे प्रशिक्षण