लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांनी सोमवार ९ आॅक्टोबरपासून बेमुदत संप सुरू केला आहे. या बंदमध्ये जिल्हाभरातील मुद्रांक विक्रेते सहभागी झाले आहेत. त्यामुळे जमिनीची खरेदी विक्रीसह, विविध शासकीय कामांसाठी प्रमाणपत्र मुद्रांकावर लिहून घेण्याचे काम ठप्प झाले आहे. राज्यात प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्था चालू ठेवून त्यावर मुद्रांक विक्रेत्यांना १० टक्के मुनोती मिळावी, राज्यात सुरु असलेली ई-चालान तसेच इएसबीटीआर प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्यामार्फत राबविण्यात यावी, एएसपी ही प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांनाच मिळावी आणि मय्यत मुद्रांक विक्रेत्यांना वारसहक्काने परवाना मिळावा या मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांची २८ फेबु्रवारी रोजी महसूल मंत्र्यासोबत चर्चा झाली होती; परंतु शासकीय पातळीवर अद्यापपावेतो मागण्यांचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संघटनेने ९ आॅक्टोबरपासून बेमुदत बंद ठेवणार असल्याचे निवेदन जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या मुद्रांक विके्र त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिले होते. त्यावर कुठलाच निर्णय झाला नसल्याने अखेर मुद्रांक विक्रे त्यांनी सोमवार ९ आॅक्टोबरपासून संप सुरू केला आहे. या संपामुळे विविध प्रकारच्या महसुली व्यवहासाठी दस्तऐवज लिहिण्याचे काम ठप्प झाले असून, जनतेला अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेते संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 8:06 PM
वाशिम: आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांनी सोमवार ९ आॅक्टोबरपासून बेमुदत संप सुरू केला आहे. या बंदमध्ये जिल्हाभरातील मुद्रांक विक्रेते सहभागी झाले आहेत. त्यामुळे जमिनीची खरेदी विक्रीसह, विविध शासकीय कामांसाठी प्रमाणपत्र मुद्रांकावर लिहून घेण्याचे काम ठप्प झाले आहे.
ठळक मुद्देमहसुली व्यवहारांवर परिणामप्रलंबित मागण्यांसाठी मुद्रांक विक्री बंद