कृषी विभाग, कारंजाद्वारे शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते बुकिंगकरिता ठरावीक ‘लिंक’ देण्यात आली आहे. त्याद्वारे शेतकरी गटाने ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. नोंदणीनुसार कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी शेतकऱ्यांनी निवडलेल्या कृषी केंद्रांवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर साहित्य पोहोचविण्याकरिता साहाय्य करीत आहेत.
मंगळवारी उकर्डा शेतशिवारातील ऋषीकेश उपाध्ये शेतकरी गटाला ऑनलाइन नोंदणी केल्याने बी-बियाणे व खते मंडळ कृषी अधिकारी संतोष चौधरी, कृषी सहायक कैलास घाडगे पाटील यांनी बांधावर उपलब्ध करून दिले. या उपक्रमामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे बोलले जात आहे.
..............
कोट:
शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खताची मागणी कारंजा कृषी कार्यालयाने दिलेल्या लिंकद्वारे नोंदवावी. त्यासाठी नजीकचे कृषी सेवा केंद्र निवडावे. कोरोनाचे संकट लक्षात घेता कृषी सेवा केंद्रावर गर्दी होणार नाही, यासाठी कृषी विभागाने खते व बियाणे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यास शेतकऱ्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
संतोष चौधरी
मंडळ कृषी अधिकारी, उकर्डा-पानगव्हाण