सायखेडा (वाशिम): जिल्ह्यातील मौजे इचोरी येथे दहा दिवसापासून डेंग्यूसदृश्य आजारांची लागण झाली असून तीन बालक या आजारात दगावल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे. उशीरा का होय ना आसोला प्राथमिक आरोग्य केंद्राने तातडीने रोग आटोक्यात आणण्याकरिता प्रयत्न चालवीले आहेत. तसेच ग्रामपंचायतने गावातील समस्याग्रस्त भागाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. इचोरी येथील एकूणच परिस्थतीवर प्रकाश टाकणारे वृत्त दै. लोकमतने अग्रक्रमाने प्रकाशीत केल्यानंतर ग्रामपंचायतसह आरोग्य विभाग तातडीने कामाला लागला आहे.
मौजे इचोरी येथे मागील काही दिवसापासून डेग्यू सदृश्य आजाराने थैमान घातले असल्याने आणि या रोगाने तिन बालकांचा मृत्यू झाल्याने गावकरी दशहतीत आहेत. काही पालकांनी आपली मुले नातेवाईकांकडे पाठविले आहेत. आजार आटोक्यात आणण्याकरिता आसोला प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक तीन दिवसापासून गावात ठाण मांडून आहे. या आजाराबाबत अद्यापही निदान लागले नसुन रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. आतापर्यंत गावात शिवानंद सोपान घोडके, शिवानी विजय नागरे, पुजा राहूल कांबळे या बालकाचा मृत्यू झाला आहे. तर ऋषीकेश शिंदे, मनिषा नागरे, जागेश्वर नागरे हे अकोला येथे उपचार घेत आहेत. दि.१३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता गावातील विशाल घोडके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वािशम येथे हलविण्यात आले आहे.
** आजारामुळे शाळेला सुट्टी
आजाराची वाढती संख्या पाहून शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी इचोरी गावाला भेट दिली व तैथील परिस्थितीचा आढावा घेतला. जि.प.प्रा.मराठी शाळेला सुट्टी देण्याचे आदेश देण्यात आले.