वाशिम शहरातील रस्त्याचे मजबुतीकरण
वाशिम : स्थानिक पाटणी चौक ते अकोला नाका यादरम्यान असलेल्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून, सुरुवातीला मजबुतीकरण आणि त्यानंतर डांबरीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता काम पूर्ण झाल्यानंतर गैरसोय टळेल, अशा प्रतिक्रिया वाहनचालकांमधून उमटत आहेत.
खरीप पेरणीपूर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित व मागील काही वर्षापासून उद्भवलेल्या अडचणी विचारात घेऊन त्यावरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शनाच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र वाशिम व स्नेहदीप शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम पेरणीपूर्वी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले हाेते.
कर्मचाऱ्यांची पदे रिक्त; कामकाज प्रभावित
वाशिम : वाशिम, मालेगाव, रिसोड तालुक्यातील महसूल, पंचायत, आरोग्य, पशुसंवर्धन यासह विविध विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची १०० पेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने कामकाज प्रभावित होत असल्याचे दिसून येते.