लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात वारंवार निवेदन देवूनही दखल घेतल्या जात नसल्याने सुशिक्षित बेकार प्रकल्पग्रस्त संघटनेच्यावतिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ आॅगस्टपासून उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. शासनास प्रकल्पग्रस्तांच्या यथोचित मागण्यासाठी अनेकवेळा निवेदन, विनंती अर्ज तथा आंदोलन केले. परंतु आमच्या मागणीचा विचार करण्यात आला नाही . याकरिता आमरण उपोषणास बसत असल्याचे म्हटले आहे. उपोषणास बसणाºयांमध्ये वनीता विठ्ठलराव पडघान, महादेव गोविंदराव आढाव, विकास शालीकराम वानखेडे, भगवान नामदेव आंधळे, सुदेश सदाशिव पाचपिले, राजेश शेषराव वानखेडे, विजय चव्हाण, राजेश श्ोषराव वानखेडे, मधूकर चंपत भगत, सचिन दिवाकर वानखेडे, भगवान पुंडलीक वानखेडे यांचा समावेश आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना उपोषणाबाबत निवेदन सादर करण्यात आले होते. यावेळी महादेव गोविंदा अढाव, विकास शालीग्राम वानखेडे, मंगेश मधुकर वानखेडे, सुरेश सदाशिव पाचपीले, सचिन दिवाकर वानखेडे, राजेंद्र देवमनराव वानखेडे, गजेंद्र देवमनराव वानखेडे, रवी गुणवंत पाचपिले, राजेश शेषराव वानखेडे, सुरेश गिºहे , भगवान पुंडलीक वानखेडे यासह अनेकांचा समावेश होता.
प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्याप्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेकारांना विनाअट शासकीय सेवेत समाविष्ट करावयातून बाद झालेल्या बेकारांना तत्काळ एकरकमी १० लाख रुपय व्यवसायासाठी दयावेप्रत्येक प्रकल्पग्रस्त बेकारांना शासकीय जमिन १० एकर दयावीप्रकल्पग्रस्तांची वयाची अट ४५ वरुन ४८ करावी