सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी पोषण आहार व पौष्टिक घटकांचे महत्त्व, परसबाग तयार करणे, स्तनदा व गर्भवती महिलांची तपासणी, कुपोषित बालकांचा शोध आदी उद्देशांतून जिल्ह्यात संपूर्ण सप्टेंबर महिन्यात विविध उपक्रम व कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. वाशिम तालुक्यात काटा येथून या अभियानाला बुधवारी सुरुवात झाली. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी, पर्यवेक्षिका सुळे, धोटे, वानखेडे, गट समन्वयक शेख उपस्थित होते. गरोदर, स्तनदा माता, सहा वर्षांपर्यंतची बालके यांच्या आहारात पोषणाचे महत्त्व वाढविण्यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन प्रबोधन करणार आहेत. जिपचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, तसेच महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांच्या मार्गदर्शनात वाशिम तालुक्यात ३० सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रम व उपक्रमातून पोषण अभियान राबविणार येणार असल्याचे गवळी यांनी सांगितले.
काटा येथून पोषण अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:44 AM