शासनाने हंगाम २०२०-२१ मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेड मार्फत शेतमालाची खरेदी करण्यासाठी रिसोड येथील नाफेडच्या केंद्रावर संत गजानन महाराज नाविन्यपूर्ण कृषी प्रक्रिया सहकारी संंस्था मर्यादित उमरा या संस्थेला नाफेडने प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे.
रिसोड तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या हरभरा शेतमालाची ऑनलाईन नोंदणी करिता हंगाम २०२० - २१ मध्ये हरभरा पिकाची नोंदणी असलेला तलाठ्याचा सातबारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल क्रमांक द्यावा. तसेच शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी निवास मधील संस्थेच्या कार्यालयात हरभरा पिकाची ऑनलाईन नोंदणी करावी. या संदर्भात शेतकऱ्यांना काही अडचण अथवा अधिक माहिती हवी असल्यास ८८०६७५७५५७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष कापसे यांनी केले आहे.