शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

स्टेट बँक अपहार प्रकरणाने कर्जदारांमध्ये खळबळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 2:08 AM

मंगरुळपीर: येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील प्रमोद ठाकरे नामक कर्मचार्‍याने कर्जदार ग्राहकांच्या नावे कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याची शक्यता असून, यामुळे कर्जदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमंगरूळपीर येथील प्रकार अनेक प्रतिष्ठित अडचणीत येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील प्रमोद ठाकरे नामक कर्मचार्‍याने कर्जदार ग्राहकांच्या नावे कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याची शक्यता असून, यामुळे कर्जदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनेक कर्जदार आपापल्या खात्यांची तपासणी करीत असून, तालुक्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित याप्रक्ररणी अडचणीत येण्याची शक्यता  वर्तविली जात आहे. अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथील भारतीय स्टेट बँक शाखेत अधिकारी असलेल्या प्रमोद ठाकरे यांनी १८ लाख रुपयांच्या रकमेची अफरातफर केल्याने २६ ऑक्टोबर रोजी त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यास १ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. याच अधिकार्‍याने मंगरूळपीरच्या शाखेत कार्यरत असताना तब्बल सात कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. कर्ज घेणार्‍या ग्राहकांच्या खात्यामध्ये अफरातफर करून हा घोटाळा झाल्याची चर्चा असून, याप्रकरणी बँकेने गंभीर दखल घेतली असून, बारकाईने तपास केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

प्रतिष्ठितांवर कारवाईची टांगती तलवारया प्रकरणात मंगरूळपीर तालुक्यासह शहरातील काही सधन शेतकरी, व्यापार्‍यांचाही सहभाग असल्याची शक्यता असून, मागील आठवड्यात अकोट पोलीस यांसंबंधी तालुक्यातील जोगलदरी व शेगी याठिकाणी तपासकामी आले होते. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य पाहता यामध्ये अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. 

शेतकर्‍यांच्या कर्जाची रक्कम हडपणार्‍यांवर कठोर कारवाईसाठी लुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्रशेतकर्‍यांच्या कर्जाची रक्कम हडपणार्‍या मंगरूळपीरच्या भारतीय स्टेट बँक शाखेतील दोषी अधिकार्‍यांची व त्यांच्या दलालांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश लुंगे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनात नमूद आहे की, मंगरुळपीर तालुक्यासह शहरातील शेतकर्‍यांची भारतीय स्टेट बँक शाखेतील एका अधिकार्‍याने तसेच स्वत:ला प्रतिष्ठित म्हणवून घेणार्‍या दलालांनी शेतकर्‍यांना कर्जाची रक्कम अर्धवट देऊन उर्वरित रकमेचा अपहार केला. याप्रकरणी शासन स्तरावरून संबंधितांच्या खात्यातील व्यवहारांची चौकशी करुन शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लुंगे यांनी केली आहे. - 

टॅग्स :bankबँक